मेलबर्नच्या मैदानात टीम इंडियानं ऐतिहासिक विजयाला गवसणी घातली. वर्ल्ड कपच्या मैदानात टीम इंडियानं पुन्हा एकदा पाकिस्तानला हरवण्याचा पराक्रम गाजवला. भारताच्या या विजयाचा हीरो ठरला तो विराट कोहली. विराटनं नाबाद 82 धावांची खेळी केली. पण या खेळीनंतर विराटच्या डोळ्यात अश्रू पाहायला मिळाले. यावेळी मैदानातच विराट भावूक झालेला दिसला.