

भारत-वेस्ट इंडिज यांच्यात सुरू असलेल्या कसोटी सामन्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. 15 सप्टेंबरपासून भारत विरुद्ध-दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-20 मालिका सुरू होणार आहे.


दरम्यान भारतीय संघ टी-20 वर्ल्ड कप 2020च्या तयारीच्या दृष्टीनं दक्षिण आफ्रिकेविरोधात संघाची निवड करू शकते.


टी-20 वर्ल्ड कप आधी 22 टी-20 सामने खेळणार आहे. त्यामुळं निवड समिती कोणत्या खेळाडूंना संधी देणार हे टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीने असेल.


मीडिया रिपोर्टनुसार दक्षिण आफ्रिकेविरोधात संघ निवडताना ऋषभ पंतसोबत आणखी दोन खेळाडूंना संघात जागा मिळू शकते.


वर्ल्ड कप किंवा वेस्ट इंडिज दौऱ्यात पंतला चांगली कामगिरी करता आली नाही. बेजबाबदार शॉट खेळून तो बाद झाला. वेस्ट इंडिज विरोधात त्यानं शेवटच्या टी-20 सामन्या अर्धशतकी खेळी केली होती. त्यामुळं पंतसोबत या दोन खेळाडूंची नावे आघाडीवर आहेत.


टी-20 वर्ल्ड कपच्या दृष्टीनं पाहिल्यास धोनीच्याच राज्यातील आणि त्याच्याप्रमाणे झारखंडमधून क्रिकेटला सुरुवात करणारा इशान किशन या भारतीय संघासाठी दावेदार असू शकतो.


20 वर्षीय इशान केशननं प्रथम श्रेणी आणि आयपीएल स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 2019च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या इशान किशननं, आपल्या संघाला विजेतेपद मिळवून दिले होते.