टी-20 वर्ल्ड कप सुरू व्हायला आता अवघे काही महिने शिल्लक आहेत. खेळाडूंसह क्रिकेट रसिकही या मोठ्या स्पर्धेसाठी उत्सुक आहेत. या वर्ल्ड कपनंतर लगेचच पुढच्या वर्षी आणखी एका टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup)चं आणि 2023 साली वनडे वर्ल्ड कपचं आयोजन करण्यात येणार आहे. सगळ्या टीम सध्या टी-20 वर्ल्ड कपवरच लक्ष केंद्रीत करत असल्या तरी त्यांना वनडे वर्ल्ड कपसाठीही टीम बांधावी लागणार आहे. भारतीय टीमला अजूनतरी धोनी सारखा फिनिशर सापडलेला नाही, त्यामुळे त्यांनाही वनडेसाठी तसाच एखादा खेळाडू शोधावा लागणार आहे. (MS Dhoni)
रियान पराग : रियान पराग आयपीएल 2019 पासून क्रिकेट विश्वाला प्रभावित करत आहे. अनेकवेळा त्याने राजस्थान रॉयल्ससाठी फिनिशरची भूमिका बजावली. आयपीएल 2019 मध्ये तो अर्धशतक करणारा स्पर्धेतला सगळ्यात लहान खेळाडू ठरला. वयाच्या 17 व्या वर्षी त्याने अर्धशतक केलं होतं. रियान पराग त्याचं स्थानिक क्रिकेट आसामकडून खेळतो. 2017-18 साली त्याने रणजी मधून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 2018 साली तो अंडर-19 वर्ल्ड कपच्या भारतीय टीममध्ये होता. 2017-18 साली विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने 7 मॅचमध्येच 249 रन केले. याचसोबत तो आसामकडून सर्वाधिक रन करणारा खेळाडू बनला. (Riyan Parag/Instagram)
शाहरुख खान : सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या 2021 मोसमात शानदार कामगिरी केल्यामुळे शाहरुख खानला पंजाब किंग्सने आयपीएल लिलावात विकत घेतलं. तामीळनाडूला ट्रॉफी जिंकवून देण्यात शाहरुखने मोलाची भूमिका बजावली. क्वार्टर फायनलमध्ये शाहरुखने हिमाचल प्रदेशविरुद्ध 19 बॉलमध्ये नाबाद 41 रनची खेळी केली. 2012 साली शाहरुखने ज्युनियर चेन्नई सुपरकिंग्स स्पर्धेत अनेकांना प्रभावित केलं. यानंतर 2018-19 च्या रणजी ट्रॉफी मोसमात तो खेळला. शाहरुखला जर वेळेत तयार करण्यात आलं, तर तो फिनिशरची भूमिका चोख पार पाडू शकतो. (Shahrukh Khan)
दीपक हुड्डा : दीपक हुड्डा आयपीएल किंवा स्थानिक क्रिकेटसाठी नवीन नाव नाही, कारण तो 2014 पासून स्पर्धात्मक क्रिकेट खेळत आहे. 2014 अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये हुड्डा भारताकडून खेळला. आयपीएलमध्येही तो अनेक टीमकडून खेळला, सध्या तो पंजाबच्या टीमसोबत आहे. 2016-17 साली हुड्डाने बडोद्याकडून खेळताना आपलं पहिलं द्विशतक केलं. हुड्डाची 2018 साली निदाहस ट्रॉफीसाठी भारतीय टीममध्ये निवड झाली होती, पण त्याला अंतिम-11 मध्ये खेळण्याची संधी मिळाली नव्हती. ( Deepak Hooda)
अनुज रावत : अनुज रावत भारतासाठी नवीन विकेट-कीपर बॅट्समन ठरू शकतो. मूळचा उत्तराखंडचा असलेल्या अनुजने 2017-18 साली दिल्लीकडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं, यानंतर तो सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत खेळला. राहुल द्रविडच्या मेंटरशीपमध्ये रावत भारताच्या अंडर-19 टीमचा कर्णधार बनला. 2020 साली रावतला राजस्थान रॉयल्सने आयपीएल लिलावात विकत घेतलं, पण त्याला 2021 साली एकमेव मॅच खेळण्याची संधी मिळाली. 19 प्रथम श्रेणी मॅचमध्ये रावतने 34.25 च्या सरासरीने 925 रन केले आहेत, यामध्ये दोन शतकं आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे. 20 टी-20 मध्ये अनुजच्या नावावर 334 रन आहेत. (Anuj Rawat)
चेझियान हरिनिशांत : चेझियान हरिनिशांत याला आयपीएल 2021 साली चेन्नई सुपरकिंग्सने विकत घेतलं. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यामुळे हरिनिशांतला आयपीएलमध्ये स्थान मिळालं. हरिनिशांत विजेत्या तामीळनाडू टीमचा भाग होता. त्याने 41 च्या सरासरीने 246 रन केले. फायनलमध्येही त्याने 35 रनची महत्त्वाची खेळी केली. हरिनिशांतने 2019-20 साली रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केलं. ( C Hari Nishanth)