विराट कोहली सध्या जगातल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक आहे, यात कोणाचंही दुमत नसेल. विराट क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने रन करत आहे, त्यामुळे विराटचे फॅन फक्त भारतातच नाहीत तर जगभरात आहेत. पाकिस्तानमध्येही विराटची लोकप्रियता खूप जास्त आहे. पाकिस्तानी टीमचा फास्ट बॉलर हसन अली याची पत्नी आरजूदेखील विराटची चाहती आहे. (Samiya Hassan Ali, Virat Kohli/Instagram)