ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडला हरवून पहिल्यांदाच टी-20 वर्ल्ड कपवर (T20 World Cup) आपलं नाव कोरलं. मिचेल मार्श (Mitchell Marsh) आणि डेव्हिड वॉर्नर (David Warner) ऑस्ट्रेलियाच्या विजयाचे शिल्पकार ठरले. मार्शने 50 बॉलमध्ये नाबाद 77 रन तर वॉर्नरने 38 बॉलमध्ये 53 रनची खेळी केली होती. याआधी वॉर्नरने पाकिस्तानविरुद्ध 49 रन आणि वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 89 रन केले होते. वॉर्नरच्या या शानदार कामगिरीनंतर त्याची पत्नी कॅन्डिस वॉर्नरने आयपीएलच्या सनरायजर्स टीमवर निशाणा साधला. (PC: Candice Warner instagram)