बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय टीमची घोषणा केली आहे. आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होईल. या दौऱ्यात भारत 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. या दौऱ्यासाठी टीम इंडियाची निवड झाल्यानंतर सोशल मीडियावर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग याने सूर्यकुमार यादवला संधी न मिळाल्यामुळे नाराजी व्यक्त केली आहे.