आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians)चा सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) शानदार फॉर्ममध्ये आहे. बुधवारी सूर्यकुमारने आपल्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर बँगलोरविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईला 5 विकेटने विजय मिळवून दिला. सूर्यकुमार यादवला एबी डिव्हिलियर्सप्रमाणेच क्रिकेटच्या मैदानात 360 डिग्री शॉट खेळण्याची आवड आहे. एवढंच नाही तर त्याला टॅटू गोंदवून घेण्याची हौसही आहे.