इंग्लंडचा फास्ट बॉलर स्टुअर्ट ब्रॉड (Stuart Broad) याची होणारी पत्नी मोली किंग (Moli King) हिने एका मुलाखतीमध्ये बोल्ड उत्तरं दिली आहेत. मला स्टुअर्टपासून खूप मुलं हवी आहेत, असं मोली म्हणाली आहे. मोलीने ब्रिटीश वेबसाईट फीमेल फर्स्टला मुलाखत दिली. आमची लहान मुलं घरात सगळीकडे धावतील, असं माझं स्वप्न असल्याचं मोली म्हणाली.
ब्रॉडसोबतची भेट आयुष्यातला सगळ्यात सुंदर क्षण असल्याचं मोली म्हणाली, तसंच तो माझ्या आयुष्यात आला यासाठी मी स्वत:ला नशीबवान मानते, अशी प्रतिक्रिया मोलीने दिली. मला एक मोठं कुटुंब हवं आहे, भविष्यात या गोष्टी मला खूप आवडतील. लवकरच लहान मुलं घरात सगळीकडे धावतील, असं स्वप्न मी बघितलं आहे, असं वक्तव्य मोलीने केलं.
ब्रॉड इंग्लंडच्या टीमसोबत असल्यामुळे दोघांची बराच काळ भेट झाली नसल्याचं दु:खही मोलीने बोलून दाखवलं. आमच्या दोघांची भेट होत नसली, तरी याचा आमच्या नात्यात काहीही फरक पडला नाही, असं मोली म्हणाली. एवढा काळ जेव्हा तो लांब असतो, तेव्हा मला त्याची आठवण येते, त्याच्यासोबत फिरण्यासाठी मी फार वाट पाहू शकत नाही, असं मोलीने सांगितलं.