

चेंडूशी छेडछाड केल्या प्रकरणी एक वर्षाची बंदी घातल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथ आणि वॉर्नर पुनरागमन करणार आहेत.


स्मिथ आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळतो. तो रविवारी राजस्थान रॉयल्सच्या संघात काल दाखल झाला. ऑस्ट्रेलियाच्या वर्ल्डकप संघात स्थान निळावे यासाठी स्मिथ चांगली कामगिरी करण्याच्या प्रयत्नात असेल.


राजस्थान रॉयल्सचा ब्रॅण्ड अॅम्बेसिडर शेन वॉर्नने म्हटले की, मला विश्वास आहे स्मिथची धावांची भूक कमी झालेली नसेल. तो आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करेल.


स्मिथ क्रिकेट खेळण्यासाठी आसुसलेला आहे. त्याला क्रिकेट आवडतं आणि क्रिकेट खेळण्य़ात तो प्रविण आहे. स्मिथ आणि वॉर्नर दोघेही सर्वोत्कृष्ठ खेळाडू आहेत असेही वॉर्नने सांगितले.


आयपीएल स्मिथसाठी महत्त्वाचे आहे कारण वर्ल्डकपच्या आधी त्याला याच स्पर्धेत खेळता येणार आहे. स्मिथचा अनुभव आणि त्याच्या खेळाचा संघाला फायदा होईल असे वॉर्न म्हणाला.