भारतीय क्रिकेटपटूंना जिकडे कोट्यवधी रुपये दिले जातात, तिकडे दुसऱ्या देशांच्या खेळाडूंवर निवृत्तीनंतर छोटी-मोठी नोकरी करण्याची वेळ येते. श्रीलंकेचा माजी ऑफ स्पिनर सूरज रणदीवही असंच करत आहे. श्रीलंकेसाठी 12 टेस्ट, 31 वनडे आणि 7 टी-20 खेळणाऱ्या सूरज रणदीववर बस ड्रायव्हरची नोकरी करण्याची वेळ आली आहे. तो मेलबर्नमध्ये बस ड्रायव्हरची नोकरी करत आहे.
रणदीवने टेस्टमध्ये 43, वनडेमध्ये 36 आणि टी20 मध्ये 7 विकेट घेतल्या आहेत. यामध्ये सेहवाग, राहुल द्रविड, एमएस धोनी आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गजांच्या विकेटचाही समावेश आहे. रणदीवने श्रीलंकेच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 681, लिस्ट एमध्ये 189 आणि टी-20 मध्ये 62 विकेट घेतल्या आहेत. संपूर्ण करियरमध्ये 932 विकेट घेणारा हा खेळाडू आता बस चालवण्यासाठी मजबूर आहे. (Suraj Randiv Instagram)