धामिका प्रसादला 2015 साली वनडे आणि टेस्ट टीममधून बाहेर करण्यात आलं, यानंतर त्याची श्रीलंकेच्या टीममध्ये निवड झाली नाही. 6 वर्ष टीमच्या बाहेर राहिल्यानंतर अखेर धामिका प्रसादने निवृत्त व्हायचं ठरवलं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये निराशाजनक कामगिरी करणाऱ्या धामिका प्रसादने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त प्रदर्शन केलं. 130 मॅचमध्ये त्याने 351 विकेट घेतल्या. तर लिस्ट ए क्रिकेटमध्ये धामिका प्रसादने 119 मॅचमध्ये 154 विकेट घेतल्या.