टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली याला शनिवारी हृदयविकाराचा सौम्य धक्का लागला. यानंतर त्याला कोलकात्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात सौरव गांगुलीची कोरोना टेस्ट करण्यात आली. यानंतर त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
2/ 5
48 वर्षांच्या सौरव गांगुलीची प्रकृती सध्या स्थिर आहे. कोलकात्याच्या वूडलॅन्ड्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सौरव गांगुलीला रुग्णालयाच्या क्रिटिकल केयर यूनिट (CCU) मध्ये भरती करण्यात आलं आहे.
3/ 5
ट्रेड मिलवर व्यायाम करत असताना सौरव गांगुलीच्या छातीत दुखायला लागलं, त्यामुळे त्याला कुटुंबाने रुग्णालयात नेलं. तिकडे गांगुलीची एन्जियोप्लास्टी करण्यात आली.
4/ 5
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार गांगुलीच्या हृदयातल्या तीन रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज झाले आहेत, यातल्या एका रक्तवाहिनीत तर 90 टक्के बॉल्क झाल्याचं रिपोर्टमध्ये समोर आलं आहे.
5/ 5
पहिल्या एन्जियोप्लास्टीनंतर गांगुलीची प्रकृती स्थिर आहे. काल त्याच्या रक्तवाहिनीमध्ये स्टेंट टाकण्यात आलं. यानंतर आता पुढच्या काही दिवसात आणखी दोन स्टेंट टाकले जाऊ शकतात. (BCCI/Twitter)