टीम इंडियाचा स्टार बॅट्समन आणि नुकत्याच झालेल्या इंडिया विरुद्ध न्यूझीलंड सामन्याचा हिरो शुभमन गिल हा नेहमीच चर्चेत असतो.
2/ 9
कधी सारा तेंडुलकर सोबतच्या रिलेशनशिपच्या चर्चा तर कधी त्याच्या टीम इंडियामधील स्थानाच्या चर्चा. पण आता वेगळीच चर्चा रंगली आहे ती म्हणजे शुभमनच्या लहानपणीच्या फोटोजची. तुम्ही बघितले आहेत का हे फोटोज?
3/ 9
आज आम्ही तुम्हाला शुभमन गिलचे बालपणीचे फोटो दाखवणार आहोत. शुभमनचा जन्म 1999 मध्ये पंजाबमधील फाजलिका येथे झाला.
4/ 9
शुभमनचे शालेय शिक्षण मोहालीत झाले. लहानपणापासून क्रिकेटचे व्यसन. शुभमनला क्रिकेटर बनवण्यात त्याच्या वडिलांचा वाटा मोठा आहे.
5/ 9
शुभमनचे वडील लखविंदर सिंग हे शेतकरी आहेत. मुलाच्या सरावासाठी त्यांनी स्वतः खेळपट्टी बनवली आणि शुभमनला नेहमी खेळण्यास प्रोत्साहित केलं.
6/ 9
लखविंदर सिंग गावातील मुलांना सांगत असे की जो कोणी आपल्या मुलाला आउट करेल त्याला मी 100 रुपये देईन. अशा प्रकारे त्यांनी शुभमनला बॅटर म्हणून विकसित केले.
7/ 9
आपल्या मुलाला क्रिकेटपटू म्हणून वाढवण्यासाठी लखविंदर सिंग यांनी शेती सोडून मोहालीला राहायला गेले. तिथे त्यांनी आपल्या मुलाला पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या अकादमीत प्रवेश दिला.
8/ 9
शुभमन गिलने अंडर-16 क्रिकेटमध्ये पंजाबकडून पदार्पण केले. विजय मर्चंट ट्रॉफीमध्ये त्याने नाबाद द्विशतक झळकावले.
9/ 9
टीम इंडियाचा सलामी फलंदाज म्हणून शुभमननं आपल्या नावाची छाप सोडली आहे. गेल्या काही सामन्यांमध्ये त्यानं स्वतःच्या फलंदाजीने सर्वांनाच चकित केलं आहे.