नवी दिल्ली: सध्या देशात सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईचा कर्णधार श्रेयस अय्यर चांगल्याच फॉर्ममध्ये आहे. अय्यरने विजय हजारे ट्रॉफीच्या सलग दुसर्या सामन्यात शतक झळकावलं आहे. भारताच्या धडाकेबाज फलंदाजाने शनिवारी 116 धावांची उत्कृष्ट खेळी केली आहे. तत्पूर्वी त्याने महाराष्ट्राविरूद्ध नाबाद 103 धावा केल्या होत्या. (फोटो-AP)