फिट होताच श्रेयस अय्यरची जोरदार फटकेबाजी, एकाच दिवशी तोडल्या दोन बॅट
दुखापतीतून बरा झाल्यानंतर श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने आता सरावाला सुरुवात केली आहे. श्रेयस अय्यरने आपल्या बॅटिंगच्या सरावाचे दोन फोटो इन्स्टा स्टोरीवर शेयर केला आहे.
दुखापतीतून बरा झाल्यानंतर श्रेयस अय्यर याने आता सरावाला सुरुवात केली आहे. नेटमध्ये तो बराच घाम गाळत आहे. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेला श्रेयस अय्यर आपला फिटनेस आणि प्रॅक्टिसबाबत त्याच्या चाहत्यांना सोशल मीडियावर नेहमीच अपडेट देत असतो. (Shreyas Iyer/Instagram)
2/ 5
श्रेयस अय्यरने आपल्या बॅटिंगच्या सरावाचे दोन फोटो इन्स्टा स्टोरीवर शेयर केला आहे. पहिल्या फोटोमध्ये त्याने दोन तुटलेल्या बॅट टाकल्या आहेत. एकाच दिवसात दोन, असं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं आहे. (Shreyas Iyer/Instagram)
3/ 5
दुसऱ्या फोटोमध्ये तो प्रविण आमरेंसोबत दिसत आहे. दुखापतीतून बरं झाल्यानंतर श्रेयस प्रशिक्षक प्रविण आमरेंसोबत नेटमध्ये बॅटिंगचा सराव करत आहे. (Shreyas Iyer/Instagram)
4/ 5
भारतीय टीमच्या मधल्या फळीतला बॅट्समन असलेला श्रेयस अय्यर दुखापतीनंतर तीन महिन्यांनी बॅटिंगसाठी मैदानात उतरला. मार्च महिन्यात इंग्लंडविरुद्धच्या वनडे सीरिजदरम्यान श्रेयस अय्यरच्या खांद्याला दुखापत झाली होती. (Shreyas Iyer/Instagram)
5/ 5
आपण दुखापतीतून पूर्णपणे बरे झालो आहोत आणि आयपीएल 2021 मध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज आहोत, असं काहीच दिवसांपूर्वी श्रेयस अय्यरने सांगितलं होतं. (Shreyas Iyer/Instagram)