

आयसीसी वर्ल्ड कपमध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेवर विजय मिळवत, आपल्या मिशन वर्ल्ड कपला सुरुवात केली. त्यामुळं काही संघाना भारताची धास्ती वाटू लागली आहे. दरम्यान पाकिस्तानचा जलद गोलंदाज शोएब अख्तर यानं भारताच्या विजयानंतर इंग्लंडमध्ये अफवा परसवल्या जात आहेत असा आरोप केला आहे.


शोएब अख्तरनं आपल्या युट्युबवरुन एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्यानं भारतानं दक्षिण आफ्रिकेवर मिळवलेल्या विजयाचे कौतुक केले. तसेच, अशी अफवा पसरवली जात आहे की भारतानं आपल्या सोयीनुसार पीच बनवून घेतले आहे, असा आरोपही केला आहे.


या व्हिडिओमध्ये अख्तरनं या फक्त अफवा असल्याचेही स्पष्ट केले आहे. आयसीसी आपल्या नियमांनुसारच मैदान बनवतात. कोणत्याही संघानुसार मैदान बनवले जात नाही. असे सांगत, भारतीय फलंदाजांची तारिफ केली “वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघ सगळ्यात मजबूत संघ आहे. खेळाडूंनी आपल्या खेळीनं हा सामना जिंकला आहे, असेही सांगितले.


भारतीय संघानं वर्ल्ड कपमध्ये आपल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेला 6 विकेटनं नमवलं. यात रोहित शर्माची शतकी खेळी आणि चहच्या चार विकेट महत्त्वाच्या ठरल्या.