आफ्रिदीने पाकिस्तानकडून २७ कसोटी, ३९८ एकदिवसीय आणि ९९ टी२० सामने खेळले. कसोटीत त्याने १७१६ धावा केल्या आणि ४८ विकेट घेतल्या. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर ८ हजार ६४ धावा आणि ३९५ विकेट आहेत. टी२० क्रिकेटमध्ये आफ्रिदीने १४१६ धावा केल्या, याशिवाय ९८ विकेटही घेतल्या आहेत.