भारताचा युवा खेळाडू शुभमन गिल (Shubhaman Gill) आणि सारा तेंडुलकर (Sara Tendulkar) यांचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. गिलने आयपीएल फायनलच्या (IPL Final) आधी टीमच्या खेळाडूंसोबतचा (KKR) एक फोटो इन्स्टाग्रामवर शेयर केला. या फोटोलो सारा तेंडुलकरने लाईक केलं, यानंतर चाहत्यांनी पुन्हा एकदा गिलचं नाव सारा तेंडुलकरसोबत जोडायला सुरुवात केली.
गेल्या काही काळापासून शुभमन गिल आणि सारा तेंडुलकरचं नाव जोडलं जात आहे, पण काही महिन्यांपूर्वीच शुभमन गिल याने आपण सिंगल असल्याचं सांगितलं. तरीही चाहते यावर विश्वास ठेवायला तयार नाहीत. गिलच्या या नव्या फोटोला साराने लाईक केलं. एका मिनिटाच्या आत साराने गिलचा फोटो लाईक केल्याच्या प्रतिक्रिया चाहत्यांनी दिल्या.