या तीन भारतीय खेळाडूंची मुलं लवकरच करणार 'टीम इंडिया'मध्ये आगमन!
भारतीय क्रिकेटच्या अनेक खेळाडूंनी मैदानावर राज्य करत भारताला अनेक विजय मिळवून देत असंख्य विक्रम स्वत:च्या नावावर केले. या खेळाडूंनंतर आता त्यांची मुलंही देशासाठी खेळू इच्छित आहेत. सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar), राहुल द्रविड (Rahul Dravid) आणि संजय बांगर (Sanjay Bangar) यांची मुलं सध्या स्थानिक क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहेत.


भारतीय क्रिकेटच्या अनेक खेळाडूंनी मैदानावर राज्य करत भारताला अनेक विजय मिळवून देत असंख्य विक्रम स्वत:च्या नावावर केले. या खेळाडूंनंतर आता त्यांची मुलंही देशासाठी खेळू इच्छित आहेत. नजीकच्या भविष्यात टीम इंडियाच्या स्टार खेळाडूंची मुलंही भारतीय टीममध्ये जागा पटकवू शकतात. भारताच्या तीन माजी क्रिकेटपटूंच्या मुलांनी मैदानात तशी प्रतिभाही दाखवली आहे. येत्या काळात ही मुलं टीम इंडियाच्या जर्सीमध्ये दिसू शकतात.


भारताचा माजी ऑल राऊंडर आणि रेल्वेचा दिग्गज खेळाडू संजय बांगर (Sanjay Bangar) याला जास्त आंतरराष्ट्रीय मॅच खेळता आल्या नाहीत, पण त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये नाव कमावलं. संजय बांगर याआधी टीम इंडियाचे बॅटिंग प्रशिक्षकही होते. यानंतर आता संजय बांगरचा मुलगा आर्यनही क्रिकेट खेळत आहे. आर्यन बांगर आता इंग्लंडच्या लिस्टरशरमध्ये ज्युनियर क्रिकेट खेळणार आहे. आर्यनने कूच बिहार ट्रॉफीमध्ये चांगली कामगिरी केली आहे. अशीच मेहनत त्याने येता काही दिवसात केली, तर तो टीम इंडियाकडून खेळू शकतो. (Photo- Aryan Bangar)


सचिनचा मुलगा अर्जुन तेंडुलकरही ऑलराऊंडर आहे. अर्जुन तेंडुलकर डावखुरी फास्ट बॉलिंग आणि बॅटिंग करतो. अर्जुन टीम इंडिया अंडर-19 सोबत श्रीलंका दौऱ्यावर खेळला होता. अर्जुनकडे प्रतिभा तर आहेच, पण त्याला सचिन तेंडुलकरकडून मार्गदर्शनही मिळत आहे. याआधी अर्जुनने टीम इंडियाला नेटमध्ये बॉलिंगही केली आहे. काही काळात तो आयपीएलमध्येही दिसू शकतो. तसंच चांगली कामगिरी करून टीम इंडियाचे दरवाजेही त्याच्यासाठी उघडतील.


टीम इंडियाची भिंत म्हणून ओळख असणाऱ्या राहुल द्रविडचा मुलगा समितही क्रिकेट खेळतो. समित बंगळुरूमध्ये ज्युनियर लेव्हल क्रिकेट खेळत आहे. त्याने सुरुवातीच्या काळातच मोठ्या खेळी करून नाव कमावलं आहे. भारताच्या अंडर-19 टीमप्रमाणेच समितही वडिलांचं मोलाचं मार्गदर्शन मिळवून मोठा क्रिकेटपटू होऊ शकतो. (Photo- Rahul Dravid Facebook)