IPL 2021 च्या बायो बबलमध्ये कोरोना विषाणूची एंट्री झाल्यानंतर या स्पर्धेला स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानंतर सर्व खेळाडू त्यांच्या-त्यांच्या घरी परतले आहेत, मात्र ऑस्ट्रेलियाकडून प्रवासी वाहतूक बंद करण्यात आल्यानं ऑस्ट्रेलियन खेळाडू सध्या मालदीवमध्ये आहेत. सॅम करनही सध्या मालदीवमध्ये आहे आणि सोशल मीडियावर आपल्या गर्लफ्रेंड इसाबेल सायमंड विलमॉटला जन्मदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (Sam Curran/Instagram)
चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असताना सॅमनं उत्कृष्ट कामगिरी केली होती. आयपीएल 2021 पुढे ढकलण्यापूर्वी त्यानं खेळलेल्या सात सामन्यांत 52 धावा केल्या आणि 9 विकेट्सही घेतल्या. धोनी कर्णधार असलेल्या सीएसके सात पैकी पाच सामने जिंकून दुसर्या स्थानावर कब्जा केला आहे. (Isabella Symonds-Willmott/Instagram)