

आयपीएल (IPL 2020)मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super kings)कडून खेळणाऱ्या सॅम करन (Sam Curran)ने चांगली कामगिरी केली आहे. बॅटिंग असो किंवा बॉलिंग करनने मोक्याच्या क्षणी चेन्नईसाठी महत्त्वाचं योगदान दिलं आहे. चेन्नईची टीम सॅम करनला मोठा मॅच विनर मानत आहे. ज्या प्रकारे त्याने या स्पर्धेत मैदानात येताच मारलेले उत्तुंग सिक्स बघता त्याच्यातली प्रतिभा दिसून येते. सॅम करन हा क्रिकेटसोबतच त्याच्या लूक्समुळेही लोकप्रिय आहे. सॅम करनची भारतात महिला फॅन फॉलोइंगही चांगली आहे.


सॅम करनची गर्लफ्रेंड इसाबेला हिचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. क्रिकेट खेळत नसताना सॅम करन गर्लफ्रेंडसोबत वेळ घालवतो. सॅम आणि इसाबेला अनेकवेळा प्रवास करतानाही दिसले आहेत.


सॅम करनची गर्लफ्रेंड इसाबेला बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. समुद्र किनाऱ्यावर सुट्टी एन्जॉय करणं तिला आवडतं.