Home » photogallery » sport » SACHIN TENDULKAR TO FINANCIALLY SUPPORT 560 CHILDREN FROM ECONOMICALLY WEAKER BACKGROUND SEHORE MADHYA PRADESH MHPG
560 आदिवासी लहान मुलांसाठी सचिन तेंडुलकर झाला 'देव', अशी करत आहे मदत
दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) तब्बल 560 आदिवासी मुलांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे.
|
1/ 5
दिग्गज क्रिकेटपटू मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) तब्बल 560 आदिवासी मुलांना मदत करण्यासाठी पुढे आला आहे.
2/ 5
या मुलांना आर्थिक मदत करण्यासाठी स्वयंसेवी संस्थेबरोबर सचिनने हात मिळवला आहे. मध्य प्रदेशातील सीहोर जिल्ह्यातील दुर्गम गावात सेवा कॉटेज बांधण्यात आले आहेत.
3/ 5
सीहोर जिल्ह्यातील सेवानिया, बिलापती, खप्पा, नयापुरा आणि जमुंझील या गावातील मुलांना सचिनची संस्था पोषक आहार व शिक्षण देणार आहे. ही मुलं प्रामुख्याने बरेला भील आणि गोंड जमातीची आहेत.
4/ 5
रिपोर्टनुसार, सचिन तेंडुलकरचा हा उपक्रम कुपोषण आणि शिक्षणाचा अभाव असलेल्या मध्य प्रदेशातील आदिवासी मुलांसाठी मौल्याचा ठरेल.
5/ 5
सचिन तेंडुलकर यूनिसेफच्या माध्यामातून कायमच मुलांच्या प्रारंभिक विकासासह इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर आपलं मत आणि मदत करत असतो.