मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचे (Sachin Tendulkar) काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोमध्ये सचिन रक्तदान करून ऍम्ब्युलन्समधून बाहेर येत आहे. सचिनने आपल्या घराबाहेर सुरू असलेल्या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला. कोरोनातून बरं झाल्यानंतर जेव्हा पात्र होऊ तेव्हा आपण प्लाझ्मा दान करू, असंही सचिनने सांगितलं होतं. (PIC: Viral bhayani)
कोरोना काळात बायो-बबलमध्ये अधिक काळ घालवल्यानंतर खेळाडूंच्या मानसिक आरोग्यवर परिणाम होत आहे, त्यावर सचिनने भाष्य केलं होतं. यावर मात करण्यासाठी पहिले या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. शारिरिक तयारीसोबत तुम्हाला मानसिकरित्याही तयार व्हावं लागेल, मलाही या गोष्टी नंतर उमगल्या, अशी प्रतिक्रिया सचिनने दिली होती. (Sachin Tendulkar/Instagram)