

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आज 47वा वाढदिवस साजरा करत आहे. त्याच्या कारकिर्दीतील काही प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाले आहेत. खास हे कँडिड फोटो घेऊन आम्ही आज आलो आहोत.


भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह याने सचिनला कडकडून मिठी मारली जेव्हा पोर्ट ऑफ स्पेनमध्ये होत असलेल्या पाचव्या एकदिवसीय सामन्यात (2002) क्रिकेटपटू ब्रायन लारा झेलबाद झाला. (Image AFP)


विनोद कांबळी आणि सचिन यांनी मैत्रि जगजाहीर आहे. दोघांनी एकाच मैदानातून त्यांच्या करिअरची सुरूवात केली होती.


मुंबईतील 'Make a Wish' या फाऊंडेशनच्या एका कार्यक्रमामध्ये कॅन्सरबाधित मुलांबरोबर वेळ घालवताना सचिनच्या चेहऱ्यावर निखळ आनंद दिसत आहे


सचिनाच्या कारकिर्दीमध्ये त्याची पत्नी अंजली हिची विशेष भूमिका आहे. तिच्याबरोबर वाढदिवसच नव्हे तर असे अनेक आनंदी क्षण सचिनने साजरे केले आहेत


कितीही व्याप असले तरी सचिन नेहमीच त्याची मुलगी सारा आणि मुलगा अर्जून या दोघांबरोबर वेळ घालवताना दिसला आहे


मुंबईतील एका शाळेतील वर्ग बांधण्यासाठी सचिनने निधी दान केला होता. त्या शाळेत सरप्राइज व्हिजीट देऊन सचिनने आनंदामध्ये आणखी भर टाकली होती.


बॉलिवूड संगीतकार अनू मलिककडे असणाऱ्या जगरात्यामध्ये देखील सचिन आणि त्याची पत्नी अंजली यांनी हजेरी लावली होती


बॉलिवूड कलाकारांबरोबरही सचिनचे जवळचे संबध आहेत. अभिनेता अभिषेक बच्चनबरोबरही त्याचे मैत्रीपूर्ण संबध आहेत


चित्रपट सृष्टीतील बादशाह शाहरूख खान आणि क्रिकेटच्या मैदानातील बादशाह सचिन तेंडुलकर एकाच फ्रेममध्ये.


सचिन आणि अंजली तेंडुलकर यांंच्यासमवेत असणारा विराट-अनुष्काचा हा फोटो त्यांच्यातील मैत्रीचं नात सांगत आहे


लहान मुलांमध्ये सचिन कायमच फेव्हरिट राहिला आहे. केवळ क्रिकेटच्या मैदानातच नव्हे तर तो लहान मुलांमध्ये फुटबॉल खेळतानाही रमतो.


एअरफोर्सच्या 85व्या संचलनादरम्यान गाझियाबादमधील Hindon Air Force base याठिकाणी सचिन उपस्थित होता.


आजही सचिनचे तेवढेच फॅन्स आहेत, जेवढे त्याने आतापर्यंतच्या कारकिर्दीमध्ये कमावले आहेत. याच फॅन्सच्या गराड्यात अनेकदा सचिन रमलेला आजही पाहायला मिळतो


सचिनच्या हाताखाली अनेक क्रिकेटपटू तयार झाले आहेत. याच नवख्या क्रिकेटपटूंना सचिनने वेळोवेळी मार्गदर्शन केले आहे