भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात खेळू शकला नाही. रोहित सध्या त्याची पत्नी रितिकाच्या भावाच्या लग्नात व्यस्त असून तो सध्या आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहे. काल रोहित आणि रितिकाचा मेहुण्याच्या संगीत सोहोळ्यात केलेला डान्स व्हिडिओ सर्वांसमोर आला होता. तर आज लग्नाच्या दिवशी रोहितची पत्नी रितिकाचा साडीतील ग्लॅमरस फोटो समोर आले असून तीच सौंदर्य चाहत्यांना घायाळ करीत आहे.
रितिका सजदेह हिच्या भावाच्या लग्नातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये रितिका ही जांभळ्या साडीमध्ये दिसत असून तिचा ग्लॅमरस लूक चाहत्यांना घायाळ करीत आहे.
2/ 5
रितिकाने तिच्या इंस्टाग्रामवर भावाच्या लग्नाचे फोटो शेअर केले असून यात रितिका आणि रोहित त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत नाचताना आणी आनंद साजरा करताना दिसत आहेत.
3/ 5
रोहित शर्माची मुलगी समायरा देखील मामाच्या लग्नात खूप एन्जॉय करताना दिसत आहे.
4/ 5
पत्नी रितिका सह रोहित शर्मा देखील या लग्नसोहळ्यात देसी लूकमध्ये दिसला. यात रोहितने हिरवा, नारंगी इत्यादी रंगाचे कुर्ते परिधान केले होते.
5/ 5
रोहित शर्माला मेहुण्याच्या लग्नामुळे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेतील पहिल्या सामन्यात उपस्थित राहता आले नाही. परंतु तो उर्वरित दोन वनडे सामन्यांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार आहे.