'हे' स्वप्न पूर्ण झाल्यावर रोहित शर्मा घेणार निवृत्ती! स्वत:च केला खुलासा
रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी मोठी अपडेट, हे स्वप्न पूर्ण झाल्यावर हिटमॅन घेणार निवृत्ती!
|
1/ 6
हिटमॅन रोहित शर्मा सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. 2019मध्ये रोहित शर्मानं तुफान फलंदाज करत जगातील टॉप खेळाडूंमध्ये स्थान मिळवले. आयसीसी वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्मानं पाच शतकी खेळी केल्या होत्या, मात्र तरी भारताला वर्ल्ड कप जिंकता आला नाही.
2/ 6
रोहित शर्मा 2007 टी-20 वर्ल्ड कप संघाचा भाग राहिला आहे. मात्र रोहित एकदिवसीय संघाचा भाग नव्हता. वनडे विश्वचषक त्याला अजून जिंकता आलेला नाही. त्यामुळे निवृत्ती घेण्याआधी वर्ल्ड कप जिंकणे हे रोहित शर्माचे स्वप्न आहे.
3/ 6
रोहित शर्मानं याआधी एका मुलाखतीत, “तुम्हाला प्रत्येक वेळी मैदानावर जाऊन विजयी व्हायचे असते. मात्र वर्ल्ड कप जिंकणे हे प्रत्येकाचे ध्येय आहे. मला वर्ल्ड कप जिंकायचे आहे.”, असे रोहित म्हणाला होता.
4/ 6
2015 आणि 2019 या दोन्ही वर्ल्ड कपसाठी रोहितचा भारतीय संघात समावेश होता. मात्र भारतीय संघाला उपांत्य सामन्यातच पराभव स्विकारावा लागल्याने तिसरा वनडे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न साकारता आले नाही. त्यामुळे रोहितलाही वनडे वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही.
5/ 6
रोहित सध्या आयपीएलमधील फ्रंचायझी संघ मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाचा कर्णधार आहे. त्याच्या नेतृत्वाखाली मुंबईने 4 वेळा विजेतेपद मिळवले आहे.
6/ 6
आता रोहित पाचव्यांदा आपल्या संघाला विजेतेपद मिळवून देण्यासाठी सज्ज आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आयपीएल स्पर्धेसाठी रोहितनं सरावाला सुरुवात केली आहे.