Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
IPL 2020 : आयपीएल फायनलनंतर चार्टर्ड विमानाने ऑस्ट्रेलियाला जाणार रोहित!
आयपीएल (IPL 2020) च्या पंजाब (KXIP) विरुद्धच्या मॅचवेळी मुंबई (Mumbai Indians) चा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ला दुखापत झाली होती. त्यामुळे रोहितची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड झाली नव्हती.
1/ 5


रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएल (IPL 2020)च्या काही मॅच दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. पण मुंबई (Mumbai Indians)च्या टीममध्ये रोहितचं पुनरागमन झाल्यामुळे बीसीसीआय (BCCI)च्या अपेक्षाही वाढल्या आहेत. त्यामुळे रोहित चार्टर्ड विमानाने 11 नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला जाऊ शकतो.
2/ 5


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लवकरच याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. रोहित टीमसोबत राहिला आणि फिजियो नितीन पटेल आणि ट्रेनर निक वेब यांच्यासोबत काम केलं तर चांगलं होईल, असं सूत्राने सांगितलं.
3/ 5


गरज पडली तर रोहितला वनडे सीरिजसाठी आराम दिला जाऊ शकतो. 27 नोव्हेंबरपासून वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. रोहितचं टी-20 सीरिजसाठी टीममध्ये पुनरागमन होऊ शकतं.