ऋषभ पंत क्रिकेटसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. गेल्या काही वर्षांपासून पंत इशा नेगीला (Isha Negi) डेट करत असल्याचं बोललं जातं. इशा नेगीचा आज वाढदिवस आहे, त्यानिमित्त ऋषभ पंतने इशाला विश केलं आहे. इन्स्टाग्राम स्टोरीवर ऋषभ पंतने इशा नेगीचा एक फोटो शेयर केला. हॅपी बर्थडे इशा नेगी असं कॅप्शन देत पंतने इमोजीही पोस्ट केली.