T20 Cricket : रिकी पॉन्टिंगनं निवडले टी20 तले सर्वोत्तम पाच खेळाडू, दोन भारतीयांचा समावेश
मुंबई, 5 सप्टेंबर: ऑस्ट्रेलियाच्या महान कर्णधार रिकी पॉन्टिंगनं सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या सर्वोत्तम पाच खेळाडूंची निवड केली आहे. त्यात दोन भारतीय तर इंग्लंड, अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या एका खेळाडूचा समावेश आहे. महत्वाचं म्हणजे पॉन्टिंगनं या पाच खेळाडूंमध्ये एकाही ऑस्ट्रेलियन खेळाडूला स्थान दिलेलं नाही.
पॉन्टिंगच्या टॉप-5 लिस्टमध्ये पहिल्या नंबरवर आहे तो अफगाणिस्तानचा रशिद खान. पॉन्टिंगच्या मते रशिद खानला जर आयपीएलच्या लिलावात उतरवलं तर त्याला सर्वाधिक बोली लागेल.
2/ 5
टॉप-5 मध्ये दुसऱ्या नंबरवन आहे पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम. बाबर सध्या टी20 रँकिंगमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
3/ 5
तिसऱ्या क्रमांकावर आहे टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्या. पंड्यानं गेल्या काही महिन्यात ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीनं सर्वांनाच प्रभावित केलं आहे.
4/ 5
या यादीत चौथा नंबर लागतो तो इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरचा. बटलर हा टी20 क्रिकेटमधल्या विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे.
5/ 5
पॉन्टिंगनं आपल्या टॉप-5 खेळाडूंच्या यादीत भारताच्या जसप्रीत बुमराचाही समावेश केला आहे. बुमरा हा सध्याच्या घडीचा टी 20तला एक घातक गोलंदाज आहे.