2021 हे वर्ष संपलं पण त्यात क्रिकेटमध्ये अनेक विक्रम नोंदवले गेले. 2021 मध्ये कसोटी क्रिकेटमध्येही काही धडाकेबाज फलंदाजांनी आपल्या बॅटिंगने क्रिकेटप्रेमींना मंत्रमुग्ध केलं. त्यात नवीन खेळाडूंपासून दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळं आता 2021 मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या टॉप-5 खेळाडूंची माहिती घेऊयात.
दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने यावर्षी कसोटी क्रिकेटला अलविदा केलेलं आहे पण या यष्टिरक्षक फलंदाजाने 2021 मध्ये चांगली कामगिरी केली. त्याने या फॉरमॅटमध्ये एकूण 6 कसोटी सामने खेळले आणि 10 डावात 348 धावा केल्या. 2021 मध्ये त्याने या फॉरमॅटमध्ये एकूण 8 षटकार मारले होते त्यामुळं तो या लिस्टमध्ये क्रमांक 4 वर आहे.