टीम इंडियाचा ओपनर पृथ्वी शॉ याने 2018 साली वेस्ट इंडिजविरुद्धच्या टेस्ट मॅचमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. या काळात त्याने 5 टेस्ट आणि 3 वनडेही खेळल्या. पण पृथ्वी शॉची जेवढी चर्चा मैदानात व्हायला पाहिजे, त्यापेक्षा ती मैदानाबाहेरच झाली. (Prithvi Shaw/Instagram)
2/ 4
आपल्या छोट्याशा कारकिर्दीमध्ये पृथ्वी शॉने अनेक उताच चढाव पाहिले. खराब कामगिरीमुळे तो टीमबाहेर झाला. दुखापत झाली, टीका झाली तसंच डोपिंगमुळे बंदीही घालण्यात आली, पण तरीही पृथ्वी शॉ हिंमत हरला नाही. (Prithvi Shaw/Instagram)
3/ 4
क्रिकबझशी बोलताना पृथ्वी शॉने ट्रोलर्सना प्रत्युत्तर द्यायची पद्धत सांगितली. ट्रोलर्सचं तोंड बंद करण्याचा एकमेव मार्ग आहे, तो म्हणजे चांगली बॅटिंग करून रन करणं. (Prithvi Shaw/Instagram)
4/ 4
'कधी कधी सगळं बंद करायची इच्छा व्हायची, पण भारतासाठी खेळणं माझं स्वप्न आहे. अनेकवेळा ज्या गोष्टी खऱ्या नव्हत्या, त्यादेखील ऐकाव्या लागत होत्या. त्यामुळे बॅटिंग करा, रन करा आणि खूश राहा,' असं पृथ्वी शॉ म्हणाला. (Prithvi Shaw/Instagram)