आयपीएलमध्ये क्रिकेट आणि मनोरंजन असा दोन्हीचा थरार यंदा बघायला मिळत आहे. मैदानाशिवाय क्रिकेटच्या मैदानाबाहेरही अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. याबद्दल चाहत्यांच्या मनातही खूप उत्सुकता असते. अशाच काही घटनांबद्दल खेळाडू आणि संघमालक त्यांच्या आठवणी सामन्यावेळी सांगतात. अशीच एक भन्नाट आठवण पंजाब किंग्जची मालकीन असलेल्या प्रीती झिंटाने सांगितली आहे.
किंग्ज इलेव्हन पंजाबचा संघ सामना जिंकल्यानंतर हॉटेलवर परतला. पण युवराज सिंग, इरफान पठाण यांना हॉटेलचे जेवण आवडले नाही. तेव्हा क्रिकेटपटूंनी प्रीती झिंटाने दिलेल्या ऑफरची आठवण करून देत आलू पराठा खाण्याची मागणी केली. प्रीतीने आनंदाच्या भरात आलू पराठे करायला सुरुवात केली. पण जेव्हा प्लेअर्सनी खायला सुरुवात केली तेव्हा तिला घाम फुटला.