कॅप्तान कायरन पोलार्ड याने प्रवीण तांबेला मॅचच्या 11व्या ओवरमध्ये बॉल दिली आणि त्याचं स्वागत जादरानने षटकारसह केला. यानंतर पाचव्या बॉलमध्ये जादरानने मिडविकेट वर चौकार मारला. मात्र तांबे याने आपल्या अनुभवाचा वापर करीत जादकरानची विकेट घेतली. प्रवीण तांबेने गुगली बॉलवर जादरानला पोलार्डकडून कॅच आउट केलं.
प्रवीण तांबेला बीसीसीआयने आयपीएल 2020 मध्ये खेळण्यासाठी बॅन केलं होतं. 48 वर्षांच्या या बॉलरला केकेआरने 20 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर खरेदी केलं होतं. मात्र शारजाहमध्ये झालेल्या टी10 लीगमध्ये भाग घेतल्याने तो आयपीएलमधून बाहेर गेला. प्रवीण तांबे (Pravin Tambe) याने 2018 मध्ये निवृत्ती घेतली होती. ज्याबाबत त्याने मुंबई क्रिकेट संघाला माहिती दिली होती. यानंतर तो शारजाहमध्ये टी10 लीग खेळला. टूर्नामेंटनंतर तो पुन्हा परतला आणि मुंबई लीगचा भाग झाला.