अंडर-19 वर्ल्ड कप 2022 मध्ये (Under 19 World Cup) अनेक युवा क्रिकेटपटूंनी छाप पाडली. टीम इंडियाने (Team India) फायनलमध्ये इंग्लंडला हरवून पाचव्यांदा ट्रॉफी जिंकली. कर्णधार म्हणून यश ढूलने (Yash Dhull) टीमचं यशस्वी नेतृत्व केलं. वर्ल्ड कपनंतर या युवा खेळाडूंचं लक्ष आता आयपीएल 2022 च्या लिलावावर (IPL 2022 Mega Auction) आहे. 12 आणि 13 फेब्रुवारीला बँगलोरमध्ये आयपीएलचा लिलाव होणार आहे. या युवा खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिकेचा युवा बॅटर डेवाल्ड ब्रेविसने (Dewald Brevis) अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये 6 मॅच खेळून सर्वाधिक 506 रन केले. वर्ल्ड क्रिकेटमध्ये बेबी डिव्हिलियर्स (Baby De Villiers) नावाने प्रसिद्ध असलेल्या ब्रेविसला अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये प्लेयर ऑफ द टुर्नामेंट देऊन गौरवण्यात आलं. आयपीएल 2022 च्या लिलावात ब्रेविसने त्याची बेस प्राईज 20 लाख रुपये ठेवली आहे. एबी डिव्हिलियर्स (Ab De Villiers) प्रमाणे मैदानाच्या चारही दिशांनी शॉट मारण्याची क्षमता असल्यामुळे ब्रेविसला बेबी डिव्हिलियर्स म्हणलं जातं. (PHOTO- Brevis/Instagram)
भारताचा कर्णधार यश ढूल (Yash Dhull) याच्यासाठी अंडर-19 वर्ल्ड कप शानदार राहिला. ढूलने 4 मॅचमध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाच्या मदतीने 229 रन केले. सेमी फायनलमध्ये ढूलने शतक करत विराट कोहली आणि उन्मुक्त चंद यांच्या क्लबमध्ये एण्ट्री घेतली. ढूलचीही आयपीएल लिलावाची बेस प्राईज 20 लाख रुपये आहे. (PHOTO- Twitter/Bcci)