'स्वप्न पूर्ण झालं...' म्हणत या क्रिकेटरच्या पत्नीनं IPL ट्रॉफीसह शेअर केला फोटो
मुख्य प्रशिक्षक आशिष नेहरा (Ashish Nehra) याच्या मार्गदर्शनाखाली गुजरात टायटन्सने आयपीएल 2022 चं विजेतेपद पटकावलं. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखालील गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून पराभव करून त्यांच्या पदार्पणाच्या मोसमात ट्रॉफी जिंकली. आशिष नेहरा आयपीएलच्या इतिहासातील पहिला मुख्य प्रशिक्षक ठरला, ज्याच्या देखरेखीखाली संघाने ट्रॉफीवर कब्जा केला. आशिष नेहराची पत्नी रुश्मा नेहराने (Rushma Nehra) सोशल मीडियावर आयपीएल ट्रॉफीसोबतचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यावर अनुभवी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने (Yuvraj Singh) मजेशीर कमेंट केली आहे.
आशिष नेहराची पत्नी रुश्माने शेअर केलेल्या फोटोमध्ये नेहरा आणि रुश्माशिवाय त्यांचा मुलगा आणि मुलगीही आहेत. रुश्मा आणि त्यांच्या मुलाने ट्रॉफी हातात घेतली आहे. या दरम्यान बेडवर पडलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मोठं हास्य आहे. (Photo - Instagram)
2/ 6
रुश्मा नेहराने तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोचं कॅप्शन आहे, 'स्वप्न पूर्ण झालं, नेहरा जी आणि संपूर्ण गुजरात टीमचा खूप अभिमान आहे.' (Photo - Instagram)
3/ 6
रुश्मा नेहराने तीन फोटो शेअर केले आहेत. दुसऱ्या फोटोत फक्त चमकणारी आयपीएल ट्रॉफी आहे. तर, तिसर्या फोटोत आशिष नेहरा आणि कर्णधार हार्दिक पंड्या मिठी मारत आहेत. (Photo - Instagram)
4/ 6
आशिष नेहराच्या पत्नीने शेअर केलेल्या फोटोवर भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने कमेंट केली आहे. युवराजने लिहिले, 'छा गए नेहरा जी.' नेहरा आणि युवराज दीर्घकाळ टीम इंडियासाठी एकत्र खेळले आहेत. (Photo - Instagram)
5/ 6
गुजरात टायटन्स चॅम्पियन बनल्यानंतर आशिष नेहराचं खूप कौतुक होत आहे. संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने स्वतः सांगितलं की, चॅम्पियन होण्यामागे 'आशु पा' यांची महत्त्वाची भूमिका आहे, ज्यांनी सर्व खेळाडूंवर कठोर परिश्रम घेतले. (Photo - Instagram)
6/ 6
आशिष नेहरा यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे गोलंदाजी प्रशिक्षक होते. दिल्लीच्या या माजी वेगवान गोलंदाजाने गुजरातमध्ये सामील होताच इतिहास रचला. गुजरातचा संघ प्रथमच आयपीएलमध्ये सहभागी झाला होता. (Photo - Instagram)