अबुधाबी T10 लीग 19 नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. फ्रेंचायझी क्रिकेट संघाची ती पहिली महिला प्रशिक्षक ठरली आहे. साराला अबुधाबी संघाची सहाय्यक प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. मुख्य प्रशिक्षक पॉल फारब्रेस आणि दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुजनर यांच्यासोबत ती संघाची जबाबदारी सांभाळणार आहे. दरम्यान, तिचे न्यूड फोटो पुन्हा एकदा व्हायरल होत आहेत.
मागील वर्षी साराने न्यूड पोजमध्ये फोटोशुट केले होते. त्यामध्ये साराने हातात बॅट ठेवून एक न्यूड फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केला. सारा टेलर ही महिलांच्या आरोग्यविषयी अडचणींबाबतच्या मोहिमेचा भाग आहे. युकेच्या वुमन्स हेल्थ मॅगझिनने महिलांच्या शारिरिक अडचणींबाबत जागरुकता निर्माण व्हावी, यासाठी मोहीम सुरु केली होती.
'इतर महिलांप्रमाणे मलाही माझ्या शरीराबद्दल तक्रार करण्याची सवय आहे, पण आता मी त्यावर मात केली आहे. एक प्रकारे हे महिला सक्षमीकरण आहे. प्रत्येक दुसरी मुलगी सुंदर दिसते. कृपया लक्षात ठेवा की प्रत्येक मुलगी सुंदर असते. महिलांनी मानसिक आणि शारीरिक समस्यांमधून बाहेर पडण्याची गरज आहे. असे साराने मोहिमेअंतर्गत म्हटले आहे.