झारखंडची राजधानी असलेल्या रांचीच्या भाजी मार्केटमध्ये सध्या एमएस धोनी (MS Dhoni) च्या इजा फार्म हाऊसच्या भाज्यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. धोनीच्या फार्म हाऊसमधून रांचीच्या बाजारात रोज ताज्या भाज्या पोहोचत आहेत. रांचीच्या भाजी बाजारात धोनीच्या फार्म हाऊसमधल्या भाज्यांचे स्टॉल लागले आहेत. या स्टॉलवर धोनीचे फोटोही लावण्यात आले आहेत.