मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » ऑलिंपिक पदकासाठी किती भयंकर मेहनत घेतात खेळाडू पाहा; घामच नाही तर अक्षरशः रक्तही गाळतात

ऑलिंपिक पदकासाठी किती भयंकर मेहनत घेतात खेळाडू पाहा; घामच नाही तर अक्षरशः रक्तही गाळतात

खेळांचा कुंभमेळा मानला जाणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये पदक मिळवणं, हा प्रत्येक खेळाडूसाठी आणि त्याच्या देशासाठी अभिमानाचा भाग असतो. मात्र तिथपर्यंत पोहोचण्यासाठी हे खेळाडू केवळ घामच नव्हे, तर रक्तही गाळत असतात. फिलिपिन्ससाठी पहिलं सुवर्णपदक जिंकणाऱ्या हिडिलिन डियाजनं आपल्या रक्ताळलेल्या हाताचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यानंतर खेळाडू घेत असलेल्या मेहनतीची चर्चा जगभर रंगत आहे.