इंग्लंडचा फास्ट बॉलर जेम्स अंडरसन (James Anderson) 2 जूनपासून न्यूझीलंडविरुद्ध सुरू होणाऱ्या टेस्ट सीरिजमध्ये खेळेल. या टेस्ट मॅचमध्ये उतरताच 38 वर्षांचा अंडरसन इंग्लंडचा माजी कर्णधार एलिस्टर कूकच्या 161 टेस्ट खेळण्याच्या रेकॉर्डशी बरोबरी करेल. अंडरसन टेस्ट क्रिकेटमध्ये 600 पेक्षा जास्त विकेट घेणारा एकमेव फास्ट बॉलर आहे. त्याने 160 टेस्टमध्ये 614 विकेट घेतल्या आहेत. या दोन टेस्ट मॅचच्या सीरिजमध्ये अंडरसन भारताचा महान स्पिनर अनिल कुंबळेचा (Anil Kumble) विक्रम मोडू शकतो. कुंबळेने 132 टेस्टमध्ये 619 विकेट घेतल्या आहेत. या विक्रमापासून अंडरसन फक्त 6 विकेट लांब आहे.