

मॅच फिक्सिंगमध्ये आता आणखी एक दिग्गज क्रिकेटपटू दोषी आढळला आहे. आयसीसीच्या भ्रष्टाचारविरोधी आचार संहितेमध्ये श्रीलंकेचा दिग्गज खेळाडू दोषी असल्याचं निष्पन्न झालं आहे. आयसीसीने गुरुवारी याबाबत माहिती दिली.


श्रीलंकेचा डावखुरा फास्ट बॉलर नुवान झोयसा मॅच फिक्सिंग प्रकरणात दोषी आढळला आहे. आधीपासूनच मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे झोयसावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आता झोयसा याप्रकरणात दोषी आढळला आहे. नुवान झोयसाने भ्रष्टाचारविरोधी पथकासमोर सुनावणीच्या आपल्या अधिकाराचा वापर केला होता. (Photo-Zoysa instagram)


श्रीलंकेचा क्रिकेटपटू नुवान झोयसा निलंबितच राहिल, तसंच त्याच्या शिक्षेची घोषणा नंतर केली जाईल, असं आयसीसीने सांगितलं. झोयसावर युएईमधल्या टी-20 स्पर्धेवेळी भ्रष्टाचार केल्याचा आरोप झाला, यानंतर मे 2019 मध्ये त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. (Photo-Zoysa instagram)


श्रीलंकेकडून 30 टेस्ट आणि 95 वनडे खेळणाऱ्या नुवान झोयसाची सप्टेंबर 2015 साली श्रीलंका टीमचा बॉलिंग प्रशिक्षक म्हणून नियुक्ती झाली होती. झोयसा श्रीलंका क्रिकेटच्या हाय परफॉर्मन्स केंद्रामध्येही काम करत होता, ज्यामुळे तो सध्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्याही संपर्कात यायचा.