कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) बॅट्समन नितीश राणा (Nitish Rana) आयपीएलच्या (IPL) मागच्या काही मोसमांपासून शानदार कामगिरी करत आहे. नितीशची पत्नी साची मारवाहने सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये साची नितीशसोबत वर्क आऊट करताना दिसत आहे. या व्हिडिओला नितीशचे चाहते पसंत करत आहेत. (Saachi Marwah Instagram)
नितीश राणाने 2015 साली आयपीएलमध्ये पदार्पण केलं, तेव्हा तो मुंबई इंडियन्सकडून खेळला होता. मुंबईने तेव्हा त्याला 10 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. तीन वर्ष नितीश मुंबईच्या टीममध्ये होता, मुंबईला 2017 सालची आयपीएल जिंकवून देण्यात नितीशने मोलाची भूमिका बजावली. नितीशने 13 सामन्यांमध्ये 126 च्या स्ट्राईक रेटने 333 रन केले होते. (Saachi Marwah Instagram)