

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात आतापर्यंत 300 पेक्षा जास्त सिक्स मारण्यात आल्या आहेत. आयपीएलमध्ये या मोसमात सर्वाधिक सिक्स मारण्याचा रेकॉर्ड संजू सॅमसनच्या नावावर आहे. संजू सॅमसनने 5 मॅचमध्ये 16 सिक्स लगावले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पंजाब (KXIP)च्या निकोलस पूरनचं नाव आहे. पूरनने यंदा 15 सिक्स लगावल्या आहेत. या यादीत पूरन दुसऱ्या क्रमांकावर असला, तरी यंदा सगळ्यात लांब सिक्स त्यानेच मारली आहे. हैदराबाद (SRH)विरुद्ध पूरनने 106 मीटर लांब सिक्स मारली.


आयपीएल (IPL 2020) या मोसमात सगळ्यात लांब सिक्स मारणाऱ्या खेळाडूंमध्ये जोफ्रा आर्चर (Jofra Archer)दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 105 मीटर लांब सिक्स मारला होता. आर्चर बरोबरच पूरननेही 105 मीटर लांबीचा सिक्स मारला आहे. पूरनने या मोसमात 6 मॅचमध्ये 39.20 च्या सरासरीने आणि 178.18 च्या स्ट्राईक रेटने 196 रन केले आहेत.


तिसऱ्या क्रमांकावर चेन्नई (CSK)चा शेन वॉटसन आहे. वॉटसनने या मोसमात 101 मीटर लांब सिक्स लगावला. चेन्नईची यंदाच्या मोसमातली कामगिरी फारशी चांगली झालेली नाही. टीमला 6 पैकी फक्त 2 मॅचच जिंकता आल्या आहेत. पॉईंट्स टेबलमध्ये चेन्नई सहाव्या क्रमांकावर आहे. वॉटसनने 6 मॅचमध्ये 37 च्या सरासरी आणि 131.20 च्या स्ट्राईक रेटने 185 रन केले आहेत.


या यादीत चौथ्या क्रमांकावर पुन्हा निकोलस पूरनचं नाव आहे. पूरनने या मोसमात 100 मीटर लांब सिक्स मारला आहे. पूरनने या मोसमात 6 मॅचमध्ये 15 सिक्स ठोकले आहेत. पूरन मोठमोठे सिक्स मारत असला, तरी पंजाबच्या टीमची कामगिरी मात्र सुमार झाली आहे. पंजाबला 6 पैकी फक्त 1 मॅच जिंकता आली. पॉईंट्स टेबलमध्ये पंजाब आठव्या क्रमांकावर आहे.


आयपीएलमध्ये सगळ्यात लांब सिक्स मारणाऱ्या खेळाडूंमध्ये केवळ एक भारतीय आहे. श्रेयस अय्यरने या मोसमात 99 मीटर लांब सिक्स लगावली आहे. या यादीत अय्यर पाचव्या क्रमांकावर आहे. दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने 5 मॅचमध्ये 45.25 च्या सरासरीने आणि 143.65 च्या स्ट्राईक रेटने 181 रन केले आहेत. अय्यरने यंदाच्या स्पर्धेत 9 सिक्स मारले आहेत.