भारताला ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून देणारा नीरज चोप्रा (Neeraj Chopra Brand Value) आता तरुणांच्या गळ्यातला ताईत झाला आहे. या विजयानंतर नीरज चोप्राचं आयुष्य रातोरात बदललं. टोकयोमध्ये (Tokyo Olympic) इतिहास घडवल्यानंतर नीरज चोप्राला सोशल मीडियावरही फायदा झाला आहे. गोल्ड मेडल जिंकल्यानंतर नीरजच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्सची संख्या एका दिवसात 1.1 मिलियनने वाढली.
डीएनएने दिलेल्या वृत्तानुसार यामुळे नीरज चोप्राची ब्रॅण्ड व्हॅल्यू अनेक पट वाढली आहे. या रिपोर्टनुसार नीरजच्या ब्रॅण्ड व्हॅल्यूमध्ये एक हजार टक्क्यांनी वाढ झाली आहे. नीरज चोप्राची एंडोर्समेंट फी आता टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) एवढीच झाली आहे.
नीरज चोप्राची ब्रॅण्ड व्हॅल्यू वाढली असून त्याच्या जुन्या करारांमध्येही संशोधन केलं जाईल, असं जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सचे सीईओ मुस्तफा घोष यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं. आमच्याकडे जवळपास 80 ब्रॅण्ड्सच्या ऑफर आहेत, तर नीरजकडे पुढच्या 12-14 महिन्यांमध्ये भारत आणि परदेशातल्या प्रशिक्षण शिबीराच्या मध्ये कमी वेळ आहे, त्यामुळे आम्हाला योग्य निवड करावी लागेल, असं घोष यांनी सांगितलं.