

आयपीएलमध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाला तीनवेळा विजेतेपद जिंकता आले आहे. मात्र, आतापर्यंत त्यांना एकदाही आपला पहिला सामना जिंकता आलेला नाही.


यंदा बाराव्या हंगामातही तसचं काहीसं झालं. मुंबई इंडिन्सला पहिल्या तीन सामन्यांपैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. त्यामुळे ते गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहेत.


दरम्यान, खेळाडूंचे मनोबल वाढवण्यासाठी मुंबई इंडियन्सच्या मालकांनी संघातील खेळाडूंसाठी एक सत्र आयोजित केले होते. यावेळी विविध खेळांच्या माध्यमातून टीम बाँडींग वाढवण्याचा प्रयत्न करण्यात आला.


या टीम बॉंडींग सेशनमध्ये संघातील ज्येष्ठ आणि नवखे असे सर्व खेळाडू होते. यावेळी कर्णधार रोहित शर्मा देखील सहभागी झाला होता. सामना जिंकण्यासाठी सांघिक खेळी खुप महत्वाचे असल्याचे यावेळी रोहित शर्मानं सांगितले.


दरम्यान, यापुढे कोणत्याही सामन्यातक चुक करणाऱ्या खेळाडूला एक अणोखी शिक्षाही जाहीर करण्यात आली आहे. ही शिक्षा अशी आहे की, खेळाडूंना एक विशेष प्रकारचा ड्रेस घालावा लागणार आहे. त्यामुळे ही शिक्षा जर टाळायची असेल तर खेळाडूंना चांगली कामगिरी करावीच लागले.