

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणारा न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज मिशेल मॅक्लघनने गर्लफ्रेंड जॉर्जियासोबत लग्न केलं आहे.


जॉर्जिया इंग्लंडसोबत त्याने गेल्यावर्षी साखरपुडा केला होता. त्यानंतर आता लग्न झाल्याचं त्याने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करून सांगितलं आहे.


न्यूझीलंडच्या या वेगवान गोलंदाजाचं याआधी एका बार गर्लशी अफेअर होतं. 2012 मध्ये त्याची भेट रीनी ब्राउन हिच्याशी झाली होती. रीनीने एका मुलाखतीत त्यांच्या नात्याबद्दल खुलासा केला होता.


रीनी ब्राउनसोबत अफेअर सुरु असतानाच मिशेल मॅक्लघनला न्यूझीलंडकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला आणि जॉर्जियाशी भेट झाली.


मॅक्लघनने न्यूझीलंडकडून 48 एकदिवसीय सामने खेळताना 82 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय 29 टी20 सामन्यात 30 विकेट घेतल्या आहेत. त्यानं 2016 मध्ये न्यूझीलंडकडून अखेरचा सामना खेळला होता.