Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 4


आयपीएल (IPL 2020) च्या यंदाच्या मोसमात मुंबई (Mumbai Indians)च्या टीमने जबरदस्त कामगिरी केली आहे. या हंगामात प्ले-ऑफमध्ये पोहोचणारी मुंबई पहिली टीम ठरली आहे. आयपीएलच्या इतिहासात सगळ्यात यशस्वी असलेल्या मुंबईने दिल्ली (Delhi Capitals)विरुद्धच्या मॅचमध्ये मैदानात उतरताच नवा विक्रम केला आहे. मुंबईची टीम जगात सर्वाधिक टी-20 मॅच खेळणारी टीम बनली आहे. मुंबईने इंग्लंडची काऊंटी टीम असलेल्या समरसेटचं रेकॉर्ड मोडलं आहे.
2/ 4


मुंबईने आतापर्यंत 222 टी-20 मॅच खेळल्या आहे. मुंबईनंतर समरसेटने 221, हॅम्पशायरने 217 सस्केसने 212 आणि सरेने 211 टी-20 मॅच खेळल्या आहेत.
3/ 4


मुंबई आयपीएल इतिहासात 200 मॅच खेळणारीही पहिलीच टीम बनली आहे. मुंबईनंतर बँगलोरने 193 मॅच खेळल्या, कोलकाताने 191 आणि दिल्लीने 190 मॅच खेळल्या आहेत.