धोनीने आपल्या इजा फार्म हाऊसमध्ये विंटर डाऊन पद्धतीची स्ट्रॉबेरी लावली आहे. ही स्ट्रॉबेरी अत्यंत रसाळ असून तब्येतीसाठीही चांगली असल्याचं सांगितलं जातं. धोनीच्या फार्म हाऊसमधून दिवसाला जवळपास 80 ते 120 किलो स्ट्रॉबेरी तोडून बाजारात पाठवली जात आहे. ही स्ट्रॉबेरी तोडतानाही विशेष काळजी घेतली जात आहे.
धोनीच्या फार्म हाऊसमधून निघालेल्या स्ट्रॉबेरीला बाजारातम मोठ्याप्रमाणावर मागणी आहे. रांचीमध्ये अनेक ठिकाणी उभारण्यात आलेल्या काऊंटरवर इजा फार्म हाऊसची स्ट्रॉबेरी 400-500 रुपये प्रतीकिलो दराने विकली जात आहे. धोनी त्याच्या शेतामध्ये ऑर्गेनिक शेती करत आहे. पिकांवर तो कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत वापरत नाही.