

महेंद्रसिंग धोनीनं (MS Dhoni Retirement) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. 15 ऑगस्ट रोजी निवृत्तीची घोषणा करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले. इन्स्टाग्रामवर धोनीनं व्हिडीओ शेअर करत क्रिकेटला अलविदा केला.


धोनीनं निवृत्ती घेतल्यानंतर काही तासांतच त्याला इंग्लंड संघाकडून खेळण्याची ऑफर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटर आणि द हंड्रेड (The 100) लीगच्या लंडन स्पिरिट संघाकडून धोनीला खेळण्याची ऑफर आली आहे.


लंडन स्पिरिट संघाचा शेन वॉर्ननं धोनीला खेळण्याची ऑफर दिली आहे. ही स्पर्धा दरवर्षी इंग्लंडमध्ये खेळली जाते.


द हंड्रेड ही इंग्लंड क्रिकेट बोर्डाची प्रायोगिक स्पर्धा असून यावर्षी आठ संघांसह ही स्पर्धा सुरू होणार होती. मात्र, कोरोनामुळे प्रत्येक संघाकडून होणारी या 100 चेंडूची स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे.


धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी दोन वेळा वर्ल्ड कप जिंकणारा धोनी आयपीएल खेळताच राहणार आहे. धोनी आयपीएलमध्ये चेन्नई संघाचा कर्णधार असून 19 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेत धोनी दिसणार आहे.


आयपीएलच्या तयारीसाठी चेन्नईला पोहचल्यानंतर दुसर्याच दिवशी धोनीने निवृत्तीची घोषणा केली. धोनीनं व्हिडीओ पोस्ट करत सायंकाळी 7.29 पासून मी निवृत्त झाल्याचे समजा, अशी पोस्ट लिहिली.