

आयपीएलच्या बाराव्या हंगामाची अंतिम लढत आज मुंबई आणि चेन्नई यांच्यात होणार आहे. हा हायवोल्टेज सामना हैदराबादच्या राजीव गांधी मैदानावर होणार आहे. दरम्यान, मुंबई आणि चेन्नई तीन वेळा फायनलला एकमेकांविरुद्ध खेळले आहेत. यामध्ये मुंबईने दोनवेळा तर चेन्नईने एकवेळा विजय मिळवला आहे.


रोहित आणि धोनी यांच्या नेतृत्वाखाली सामना खेळणाऱ्या या दोन्ही संघांनी 2 वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे. तरी, चाहत्यांच्या मते धोनीहा सरस कर्णधार आहे. मात्र ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज मॅथ्यू हेडन यानं धोनीबाबत मोठं व्यक्तव्य केलं आहे.


महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नईनं आयपीएलमध्ये सर्वाधिक 8 वेळा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. दरम्यान याच धोनीबदद्ल बोलताना हेडननं धोनी एक खेळाडू नसुन तो क्रिकेटमधला एक युग आहे, अशा शब्दात त्याचं कौतुक केलं आहे.


मात्र, असे असले तरी धोनी हा गल्ली क्रिकेट संघाचा कर्णधार असल्याचं वक्तव्य हेडन यानं केलं आहे.धोनी यासाठी गल्ली क्रिकेटचा कर्णधार आहे, कारण तो छोट्या छोच्या गोष्टींचा विचार करतो. आपल्या संघासाठी तो काहीही करु शकतो, असंही हेडन म्हणला आहे. मात्र, असे असले तरी धोनी हा गल्ली क्रिकेट संघाचा कर्णधार असल्याचं वक्तव्य हेडन यानं केलं आहे.धोनी यासाठी गल्ली क्रिकेटचा कर्णधार आहे, कारण तो छोट्या छोच्या गोष्टींचा विचार करतो. आपल्या संघासाठी तो काहीही करु शकतो, असंही हेडन म्हणला आहे.


दरम्यान, ज्याप्रकारे धोनी संघाचा, मैदानाचा अभ्यास करतो, गोलंदाजांना कशी गोलंदाजी करावी, याची माहिती देतो. तो फक्त चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधारनसून संपुर्ण देशाचा कर्णधार आहे.