टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni) हा सध्या त्याच्या कुटुंब आणि मित्र परिवारासोबत शिमल्यामध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे. शिमल्यात धोनी त्याची मुलगी झिवा आणि पत्नी साक्षीसोबत एका सुंदर ठिकाणी थांबला आहे. (PC: ZIVA DHONI Instagram)
2/ 5
शिमल्यामधले धोनीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे, यामध्ये तो नव्या लूकमध्ये दिसत आहे. धोनीने त्याच्या मिशा वाढवल्या असून त्यांना पिळ दिला आहे.
3/ 5
यातल्या काही फोटोंमध्ये तो खुल्या आकाशात जीम करतानाही दिसत आहे. साक्षीने त्याच्या वर्क आऊटचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर केला आहे.
4/ 5
धोनी सध्या शिमल्यात असला तरी काही महिन्यानंतर तो पुन्हा मैदानात दिसणार आहे. (PC: sakshi dhoni instagram)
5/ 5
सप्टेंबर महिन्यात आयपीएलच्या (IPL) 14 व्या मोसमातले उरलेले 31 सामने युएईमध्ये खेळवले जाणार आहेत. यासाठी धोनी युएईला रवाना होईल. आयपीएलमध्ये धोनी चेन्नई सुपरकिंग्सचं (CSK) नेतृत्व करतो.